Tuesday 22 October 2013

कधीतरी सापडेल का शोधता-शोधता ?

This one is about evolution of life on the planet with greedy human being around !

Necessity is the mother of invention, they say.
But what happens if desires become necessities? 

Truly-desired-inventions will surely lag behind the inventions-for-desires. And then man will get what he deserves of his own making... The Global-Warming !

Within 35-years, even lowest monthly temperature will be hotter than we experienced so far !! And then it might be too late a realisation !!!

कधीतरी सापडेल का शोधता-शोधता ?

माकडांचाच सीनियर-वानर आदिमानव तो भिरभिरता
भूकेला कोंडा, निजेला धोंडा तर लाजेला होता झाडपत्ता
गाय, बैल, मांजर, पोपट; बायकोसह सारे आले पहाता-पहाता
सिक्युरीटीला त्यांच्या गॉडी-कुत्रीचा, डॉगी-कुत्रा पण भुंकता

सुखासाठी बायकोच्या, तंगडतोड भटकता-भटकता
दिसला कापूस एकदा त्याला जंगलतोड करता-सारवता
बनवली लगेच गादी त्याने, तिच्या ऐषो-आरामाकरता
नवनवीन स्वप्ने पडती स्वत:च त्यावर क्षणभर पडता
मग काय, लागती शोधावर-शोध तनिकसे त्यावर लेटता
कोंडा-गोंडा-धोंडा झाले, रोटी-कपडा-मकान बघता-बघता

नॅचरल कापसाचा बेड आता नरमा-गरम पॉलियुरेथीनचा
कपडा चिकचिकीत करणा-या चकचकीत सिंथेटीकचा
दाल-रोटी जागी हाती फास्ट-फूड-पिझ्झा कॉन्स्टिपेटींग मैद्याचा
गादी बैठकीजागी सोफा-कम-बेडवर हाती पेला मद्याचा

बार्लीची-बीअर, बाईचा-बार, शेत-जमिनीचा एफ्एस्आय्.. सारेच हु..र्रे
कोणी-अरे, कोणी-कारे, हाणती एकमेका आई-बा काढता कारे?
"आता पूरे..!" भेदून-ओझोन येता येता उपसले अंती सूर्यानेच सरसर सूरे
मग काय?.. "आटताच पाण्याचे झरे, चमकले कारे दिवसाढवळ्याच तारे?"
जीव कासावीस झालारे, गुदमरला भातारे, भिरभिरलं डोकंरे, अरेरे-अरेरे !
उपयोग काय वाटून आता, रोटी-कपडा-मकानच होते बरेरे !
कोंडा-गोंडा-धोंडाही मिळेना कायरे? लेट झालाय हेच खरेरे !

समस्यांचा मॉडर्न डायनॉसॉरच समोर, ठाकला उभा-आडवा होता
माकडांचाही माकड होउनी राहीला होता आता तो तर पूरता
वाढताच गुंत्याचाही गुंता, स्व:शी झालाच तो एकदाचा बोलता
" ... थकलोरे ! वाटच लागली नव्या शोधांची वाट पहाता-पहाता,
स्वप्नच काय, नाकी नऊ येती झोपही आता येता-येता
कळुन चुकले मला, गरज आहे स्व-शोधाचीच खरं तर पहाता आता ... "

No comments:

Post a Comment